सैनिक स्कूलचे कोरोना काळातील काम वाखाणण्याजोगे

प्रांताधिकारी प्रशांत पाणवेकर यांचे स्कूल वर्धापन दिनी उद्गार

⚡आंबोली,ता.२२-: संधीचा चांगला उपयोग करून आपल्याला कसे पुढे जाता येईल याचा ध्यास विद्यार्थ्यानी घ्यावा.सैनिक स्कूल चे कार्य आणि संस्थेची प्रगती ही गरुड झेप आहे.कोरोना काळात ही केलेले काम वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी यांनी सैनिक स्कूल सांस्कृतिक कार्यक्रम उदघाटन प्रसंगी केले. येथील सैनिक स्कूल आंबोली चा १९ वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे उदघाटन प्रांताधिकारी प्रशांत पाणवेकर यांच्याहस्ते आज करण्यात आला.

यावेळी संस्था सचिव सुनील राऊळ, जॉय डॉन्टस,दीपक राऊळ, सरपंच सावित्री पालेकर,विजय नार्वेकर,डॉ.महेश जाधव,शिवाजी परब,ऋषिकेश गावडे,नितीन गावडे,सर्कल गुरव, प्राचार्य सुरेश गावडे,राजाराम वळंजू,कॅप्टन डी. के.मोरे,श्रीकांत गावडे,छाया नार्वेकर तसेच पालक प्रतिनिधी,पालक, विद्यार्थी,उपस्थित होते.

यावेळी संस्थेचा लेखाजोगा आणि शाळेचे यशस्वी उपक्रम,इतिहास,सैन्यात आतापर्यंत यशस्वी झालेले अधिकारी तसेच शाळेची यशस्वी झेप याबाबत थोडक्यात त्यांनी निवेदन केले.यावेळी संस्था सचिव पी एफ डॉन्टस म्हणाले, या जिल्ह्यात सैन्यात अधिकारी बनण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत डॉन्टस यांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन केली.ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे याचा अभिमान आहे.आता विदयार्थी घडवणे ही जबाबदारी आमची आहे.कोरोना काळात ही कसोटीने प्रयत्न केले.”

यावेळी विविध स्पर्धेत,खेळात, जिल्हा आणि विभाग राज्य स्तरावर यशस्वी आणि प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.शाळेतील यशस्वी शिक्षकांचा सत्कार प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सिद्धेश अरुण गावडे या आंबोलीतील विद्यार्थ्याचा सत्कार प्रांताधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.सैनिक स्कूल ची वेबसाईट डिजाईन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.डॉ. चंद्रकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला.देशभक्ती सह नव्या गाण्यांवर कार्यक्रम करण्यात आले.

You cannot copy content of this page