पेटता दिवा घेऊन जातांना अंगावरील कपड्याला लागली आग : सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद
⚡सावंतवाडी ता.२२-: पेटता दिवा घेऊन जातांना अंगावरील कपड्याला आग लागल्याने सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील युवती गंभीररित्या भाजली. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी सदर युवती आग पेटविण्यासाठी पेटता दिवा घेऊन जात होती. यावेळी तिच्या अंगावरील कपड्याला आग लागुन ती जवळपास सत्तर टक्के भाजली. आई वडील नजिकच्या शेतात गेल्याने हा प्रकार उशिराने उघडकीस आला. मात्र तिला लागलीच उपचाराकरिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. येथे प्राथमिक उपचार करुन अधिक उपचाराकरिता ओरस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
