असनिये ग्रामपंचायत निवडणुकीत गाव विकास युवा पॅनलच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय

सावंतवाडी ता.२२-:

तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी असनिये गावच्या ग्रामपंचाय  सपंचपदाच्या निवडणुकीत गाव विकास युवा पॅनल ने  मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवत  सुमारे  तीस वर्षापासून  असलेली सत्ता मोडीत काढीत    धक्का दिला   आहे.

गावविकास युवा पॅनलच्या सौ रेश्मा रमेश सावंत यांच्या विरोधात   जनता गाव विकास पॅनलच्या सुजाता महादेव सावंत निवडणुकीत रिंगणात होत्या.   जनता गाव विकास पॅनल  ने निवडणूक  प्रतिष्ठेची करत   विजयासाठी  कंबर कसली होती  मात्र  प्रथमच रिंगणात उतरलेल्या गाव विकास  युवा पॅनलच्या रेश्मा सावंत यानी३६१ एवढे मताधिक्य मिळवत जवळपास १४८ मतांच्या फरकाने  विजय मिळवला.

गावविकास युवा पॅनल कडून दोन बिनविरोध सदस्य तर दोन निवडणूक लढवत सदस्य निवडून आले  आहेत

गाव विकास युवा पॅनल कडून निवडून आलेल्या  उमेदवार सौ.रेश्मा सावंत आणि सदस्य यांचे गावात   फटाक्यांची   आतशबाजी करत  मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले व गाव विकास युवा पॅनल ने सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page