कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

⚡कणकवली ता.२२-: वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथे कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

      त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , माजी कणकवली तालुका सभापती दिलीप तळेकर , कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , माजी तळेरे सरपंच साक्षी सुर्वे , गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , तळेरे सरपंच हनुमंत तळेकर , सहाय्यक गटविकास अधिकारी सुर्यकांत वारंग , शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सावंत ,तळेरे हायस्कुलचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर , उपसरपंच दिनेश मुद्रस , शशांक तळेकर , राजेश जाधव, उदय पाटील , विनय पावसकर , शरद वायंगणकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर , माजी सरपंच चंद्रकांत तळेकर , केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , संजय पवार , गोपाळ जाधव , विजय भोगले , पत्रकार गुरुप्रसाद सावंत , कासार्डे उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री जाधव , सुचिता तळेकर आणि कणकवली तालुक्यातील शिक्षक , खेळाडू , पंच शिक्षक उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

      तळेरे हायस्कुल यांच्या वतीने लेझीम नृत्याचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.मान्यवरांनी प्रज्वलित केलेली क्रीडाज्योत खेळाडूंकडे देण्यात आली. क्रीडाज्योत संचलन करण्यात आले.उमेद फाऊंडेशनच्या वतीने प्रथमोपचार पेटी वितरित करण्यात आली.क्रीडा प्रतिज्ञा घेऊन खेळाडू आणि पंच यांना सामूहिकरित्या वचन देण्यात आले.तळेरे हायस्कूलच्या गीतमंचाने सुस्वर आवाजात ईश्वस्तवन व स्वागतगीत सादर केले. कणकवली तालुक्याच्या वतीने गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

      गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार म्हणाले, कणकवली तालुकास्तर क्रीडास्पर्धा संपन्न करण्यासाठी वामनराव महाडिक हायस्कुलचे पदाधिकारी , शिक्षक व विद्यार्थी यांनी दिलेले सहकार्य मोलाचे आहे. कणकवली तालुक्याने जिल्हास्तरावर जनरल चॅम्पियनशिप मिळवावी.  माजी कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनीही खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

      समारंभपूर्वक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले.पहिल्या दिवशी लहान व मोठ्या गटातील मैदानी सर्व खेळ , खोखो , कबड्डी , रिले , धावणे , लांबउडी , उंचउडी , गोळाफेक इत्यादी खेळ घेण्यात आले. सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या , उपविजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. दुसऱ्या दिवशी समुहगीत , समूहनृत्य व ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
You cannot copy content of this page