महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे पुण्यात 5 दिवसाचे प्रशिक्षण
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-:
नवे निर्यातदार घडवणे, कृषी मालाचे निर्यातवृद्धी करणे,* *शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मूल्यवर्धन करणे आणि परकीय चलन प्राप्त करणे या प्रमुख उद्देशांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे पुणे येथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रशिक्षण देण्यात येते.
हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्समध्ये कृषिमाल निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्ती सहभाग घेवू शकते. त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा व किमान पात्रता आवश्यक नाही. या प्रशिक्षणासाठी निवासी 11 हजार 505, अनिवासी 9 हजार 735 तसेच महिलांसाठी 8 हजार 638 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रशिक्षणाचे ठिकाण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे 411037 https://maps.app.९००.९I/3i3jty+B+op989wv8 समन्वयक शैलेंद्र जाधव- ९४०३७६१२६७ विराज पाटील ८७८८८७३७५३ दूरध्वनी (०२०) २४५२८१००/२०० पणन टोल फ्री क्र.१८००२३३०२४४ ई-मेल hetc@msamb.com, export@msamb.com,संकेतस्थळ www.msamb.com वर संपर्क करावा.
