राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा शनिवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा* *जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे.

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे होणाऱ्या या स्पर्धा 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आहेत. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस, तहसीलदार अरुण उंडे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आणि यशवंतराव भोसले एज्युकेशन ट्रस्टचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत- भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

You cannot copy content of this page