शिक्षकांसाठी शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने* *प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी आज शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,अशी माहिती प्राचार्य अनुपमा तावशीकर यांनी दिली.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात सकाळी 11 ते 5.30 या वेळेत हे प्रशिक्षण होणार असून, यशदाचे प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी अभिरुप प्रात्यक्षिक देखील होणार आहेत.

You cannot copy content of this page