Headlines

जत्रोत्सवात गुडगुडे नावाचा जुगार खेळल्या प्रकरणी एकावर पोलिसांची कारवाई

८ हजार १४० रुपयांची रोख रक्कम जप्त

सावंतवाडी,ता.२१: सावंतवाडी पोलिसांनी तालुक्यातील एका जत्रोत्सवात गुडगुडे नावाचा जुगार खेळल्या प्रकरणी एकावर कारवाई केली आहे. जुगाराच्या साहित्यासह त्याच्याकडून ८ हजार १४० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चराठे येथे करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार ओम भागवत यांनी दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चराठे येथील जत्रोत्सवात “गुडगुडे” नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री उशिरा त्या ठिकाणी पोलिसांचे पथक दाखल झाले. यावेळी पोलीस आल्याची माहिती मिळताच खेळींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र खेळ लावणाऱ्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. यावेळी त्याच्याकडील जुगाराचे साहित्य व रोग रक्कम जप्त करण्यात आली. तर सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात जुगार खेळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page