तब्बल १ हजार १६३ मतांनी मिळविला विजय : विद्यमान सरपंच अक्रम खान यांच्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या प्रियांका नाईक यांनी विक्रमी विजय मिळविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत कोणत्याही सरपंचाने तब्बल १ हजार १६३ मतांनी मिळविलेला विजय हा सर्वोत्कृष्ठ आहे. तसेच विद्यमान सरपंच अक्रम खान यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये नाईक यांना सर्वाधिक ३३५ मतांचे मतधिक्क्य दिले आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने व संघटनात्मक काम केल्यानेच भाजपने याठिकाणी यश मिळविले असल्याची प्रतिक्रिया सरपंच अक्रम खान यांनी दिली.
सरपंच अक्रम खान यांनी सरपंच पोटनिवडणूकित ८६४ मतांनी विजय मिळविला होता. मात्र प्रियांका नाईक यांनी शहरातील सर्वच प्रभागात मताधिक्य मिळविले आहे. सरपंच खान यांचा प्रभाग असलेल्या ४ नंबर मध्ये नाईक यांना यांनी एकूण मतदानाच्या ८० टक्के मते घेतली आहेत. शहरात सर्वाधिक मताधिक्य त्यांना याठिकाणी मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून निवडून येण्याचा मान नाईक यांना मिळाल्याने बांदा हा भाजपचा अभेद्य गड असल्याचे सिद्ध झाले आहे.
