शिवसेनेतून उमेदवारी न दिल्याने भाजपला पाठिंबा : अमोल नाईक ; तर बुथ उपाध्यक्ष हर्षद परब, राजन पटेकर ठरले किंगमेकर
⚡बांदा ता.२१-: ग्रामपंचायत निवडणुकीत पाडलोस गावात अन्य ठिकाणी जरी भाजपला अपयश आले तरी प्रभाग दोन मध्ये भाजपने बाजी मारली. भाजपचे विनायक परब व पुष्पलता पटेकर हे दोन सदस्य बहुमतांनी विजयी झालेत. या विजयाचे किंगमेकर भाजप पाडलोस बुथ उपाध्यक्ष हर्षद परब, अमोल नाईक व राजन पटेकर असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाडलोस गावची ओळख आहे. या ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी तसे नियोजनही करण्यात आले होते परंतु तसे झाले नाही. मुख्य म्हणजे प्रभाग दोनची जबाबदारी बुथ उपाध्यक्ष हर्षद परब, राजन पटेकर व आपल्यावर देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही मेहनत घेत दोन्ही जागावर विजय संपादन केला. सहा महिन्यांपूर्वी आपणास ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेतून उमेदवारी देणार असल्याचे सांगितले होते. परंतु शब्द न पाळल्याने आपण भाजपला पाठिंबा दिल्याचे अमोल नाईक यांनी सांगितले. तसेच यापुढे प्रभागाच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेणार असून विकासकामे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
