भाजप दिलेला शब्द पाळणार

माजगावात विकासाची नवी उभारी देणार;निरीक्षक मनोज नाईक यांनी मानले मतदारांचे आभार

⚡सावंतवाडी ता.२१-: माजगाव ग्रामपंचायत निकालात सत्तांतर झाले. यावेळी जनतेने दिलेली भाजपच्या उमेदवारांना साथ तसेच उमेदवारांनी दिलेला शब्द लक्षात ठेवून यापुढे माजगावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून माजगावात पुढील पाच वर्षात विकासासाठी नवी उभारी देऊ असा विश्वास माजगाव भाजप निरीक्षक मनोज नाईक यांनी व्यक्त केला.

दरम्यान काल झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजगावात नऊ सदस्य व सरपंच निवडून येत जोरदार मुसंडी मारली. यावेळी मनोज नाईक यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी मोट बांधत हा विजय खेचून आणला असून यावेळी त्यांनी मतदारांचे व जनतेचे आभार देखील मानले आहेत.

You cannot copy content of this page