विकास कामांमध्ये जनतेने टाकला विश्वास;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा
⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपला घवघवीत यश मिळाले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. ते आज ग्रामपंचायत निकाला नंतर येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान केंद्रात व राज्यात असलेली सत्ता पाहून जनतेने स्थानिक पातळीवर देखील भाजपला साथ दिल्याने मतदराचे मनापासून आभार मानतो, असे पुढे राजन तेली म्हणाले. निवडून आलेले सर्व सरपंच यांचा लवकरच एक मोठा विजयी मेळावा घेतला जाणार आहे. यावेळी वरिष्ठ नेत्यांना बोलावून विजयी उमेदवारांचा सत्कार केला जाईल, असेही यावेळी राजन तेली यांनी सांगितले.
यावेळी महेश सारंग, रवि मडगावकर, मनोज नाईक,आदी उपस्थित होते.
