कास, रोणापाल, शेर्ले, सातोसे गावात भाजपचे वर्चस्व
⚡बांदा ता.२०-:
मडुरा ग्रामपंचायतसह कास, रोणापाल, शेर्ले, सातोसे ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत पेनलचे सरपंच बसले तर निगुडेत गाव विकास पेनल व पाडलोस मध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ता कायम ठेवली आहे.
रोणापाल मध्ये भाजपच्या सरपंच योगिता योगेश केणी व 4 सदस्य तसेच 1 बिनविरोध तर गाव विकास पेनलचा 1 सदस्य निवडून आले आहेत.
शेर्ले गावच्या सरपंचपदी भाजप पुरस्कृत पेनलचे प्रांजल जाधव व 5 सदस्य तर गाव विकास पेनलचे 4 सदस्य निवडून आले आहेत.
मडुऱ्यात सरपंचपदी भाजपचे उदय चिंदरकर व 5 सदस्य तर गाव परिवर्तनचे 4 सदस्य निवडून आले. कास ग्रामपंचायत सरपंचपदी प्रविण पंडित व 1 सदस्य निवडून तर 3 बिनविरोध तसेच गाव पेनलचे 2 सदस्य व 1 अपक्ष निवडून आले.
