⚡देवगड ता.१९-: १००८ चिंतामणी पार्श्वनाथ जयंती निमित्त अतिशय क्षेत्र खारेपाटण या ठिकाणी समाज सेवा मंडळ खारेपाटण , पद्मावती महिला मंडळ खारेपाटण,जैन श्रावक श्राविका खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने विघ्न विनाशक विश्वकल्याण कारी श्री कल्याणमंदिर विधान श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र खारेपाटण येथे सोमवार दि.१९ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण समाज सेवा मंडळ अध्यक्ष विलास डोर्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
विघ्न विनाशक विश्वकल्याणकरी कल्याण मंदिर विधानश्री सौधर्म इंद्र इंद्राणी यजमान पदाचा मान धर्मनुरागी यशवंत चंद्रकांत उर्फ पपु रायबागकर खारेपाटण याना मिळाला.तर भगवान पार्श्वनाथ यांची माता बनण्याचा मान सौ.रसिका पियुष चव्हाण (कोल्हापूर)याना प्राप्त झाला .भगवंतांची आत्ये चा मान सौ .दया कुंदप (पुणे)व सौ.वृषला विलास डोर्ले (कोल्हापूर)याना लाभला ,भगवंताच्या पाच दोऱ्यांचा मान ,सौ संपदा निरंजन चव्हाण, सौ पूजा श्रीधर कासार ,सौ स्वप्नाली डोर्ले,सौ सायली तुधार डोर्ले,सौ धनश्री सचिन ब्रम्हदंडे याना मिळाला.भगवंतांना काजळ घालणे मान सौ आशा प्रफुल्ल ब्रह्मदंडे ,तसेच प्रसाद सुंठवडा मान कु.धनश्री मोहन कावळे यांनी मिळविला.भगवंतांना मंदिरातून वेदीवर यजमानाच्या हस्ते विराजमान करण्यात येऊन कल्याणमंदिर विधानाला श्रावक श्रविकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली या उत्सवास कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन भट्टारक मठाचे महास्वामीजीं महाराज यांचे आगमन होताच नमोकार.महामंत्राच्या जयघोषात ,जयजयकार करीत मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.या वेळी महास्वामीजींनी दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन महा स्वामीजी ची पाद्यपूजा मान सखाराम राजाराम साळवी या ९४ वर्षीय श्रावक तसेच आप्पा साळवी तळवडे-राजापूर यांनी मिळविला.त्यानंतर महास्वामिजीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महास्वामीजींचे प्रवचन मंदिरातील,चिंतामणी पार्श्वनाथ अतिशय मुक्त मूर्ती वर पंचामृत अभिषेक महाआरती कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता करण्यात आली.
