मालवण येथील जलतरण स्पर्धेत विहान धूरीचे यश

⚡वेंगुर्ले ता.१९-: मालवण चिवला बिच येथर १७ व १८ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं १ च्या इयत्ता पाहिलीतील विद्यार्थी विहान विठ्ठल धुरी यांनी ६ ते ७ वर्ष वयोगटात ७ वा क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्यावतीने १२ वी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती.

यात विहान धुरी ने यश संपादन केले आहे. विहान जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला नगरपालिका जलतरण तलाव कॅम्प येथे प्रशिक्षण सराव करत आहे.

फोटो: विहान धुरी

You cannot copy content of this page