सकाळी 10 वा. मतमोजणीला सुरुवात; तहसीलदारांनी दिली माहिती
⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी होणार आहे.तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीत 10 ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असून सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
पहिल्या फेरीत म्हणजेच सकाळी 10 ते 10. 50 यावेळेत
आशिये, दारूम, सावडाव, कसवण-तळवडे, आयनल, दारिस्ते, चिंचवली, सातरल, डामरे व पियाळी.
दुसरी फेरी 10.50 ते 11.30 या वेळेत होणार असून – वरवडे, बीडवाडी, तरंदळे, बोर्डवे, कोळोशी, शिवडाव, कुरंगवणे, कासरल, तिवरे, वाघेरी या गावांचा समावेश आहे.
तिसरी फेरी 11.30 ते 12.10 या वेळेत होणार असून यामध्ये शिरवल, कोंडये, साळीस्ते, नरडवे, लोरे, नागवे, जानवली, करंजे, हरकुळ खुर्द, असलदे या गावांचा समावेश आहे.
चौथी फेरी 12.10 ते 12.50 या वेळेत होणार असून यामध्ये हळुवल, करूळ, शेर्पे, दिगवळे, घोणसरी, नडगिवे, माईण, कुंभवडे, वागदे, ओसरगांव या गावांचा समावेश आहे.
पाचवी फेरी 12 .50 ते संपेपर्यंत- कलमठ, फोंडा, हरकुळ बुद्रुक, नांदगाव, नाटळ, सांगवे, खारेपाटण, कळसुली, कासार्डे व तळेरे तर सहावी फेरी – हुंबरठ व साकेडी या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.
