माजगावात मविआचा विजय निश्चित!

राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब : माजगाव येथील बूथवर दिली भेट

⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिल असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात काटे की टक्कर असल्याचं बोललं जातंय त्यामुळे विजय कोणाचा होणार हे २० तारखेला स्पष्ट होणार आहे.

आज मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर आज कोकण विभागीय राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब माजगाव येथील बूथवर भेट देत आढावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास आहे त्यांनी या व्यक्त केला.

You cannot copy content of this page