80 टक्के पेक्षा जास्त ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकेल

माजी खास. निलेश राणे यांनी
वरवडे गावी जावून मतदानाचा बजावला हक्क

⚡कणकवली ता.१८-: केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता गाव विकासासाठी सुद्धा हवी ही जनतेची मानसिकता असल्याने 80 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

माजी खासदार निलेश राणे यांनी कणकवली वरवडे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती प्रकाश सावंत भाजपचे तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत व भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या खासदार आमदारांना गावातील लोकांनी बसायला सुद्धा खुर्ची दिलेली नाही. अनेक ठिकाणाहून चक्क हाकलून लावलं. अशी परिस्थिती असल्याने उद्धव ठाकरे गटाचे आमदार- खासदारच प्रचाराला आलेच नाहीत. त्यांना विजय मिळण्याची परिस्थितीच राहिलेली नाही. त्यामुळे मतांचा दुसरा नंबर देखील त्यांना मिळणे कठीण आहे. आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावात सक्षम उमेदवार देऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांसोबत आणि जनतेला सोबत घेऊन ही निवडणूक लढत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी एकतर्फी निवडून येईल.उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष या निवडणुकीत कोठेच दिसला नाही. त्यांना साधे उमेदवारही उभे करण्यासाठी मिळालेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार खासदारांना गावातील जनतेने बसायला खुर्ची सुद्धा दिलेली नाही. एवढी वाताहात या पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागलेली आहे.त्यामुळे या निवडणुकीत भाजपा एकतर्फी विजय मिळवणार आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.आपल्या गावाचा विकास भाजपच करू शकते याचा विश्वास जनतेला आणलेला आहे आणि म्हणूनच ग्रामपंचायतच्या निवडणुकी 80 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीकडे येथील उद्धव ठाकरे यांची शिवसेना दूरवर सुद्धा राहणार नाही असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page