▪️निलेश राणे यांचा ठाकरे गटाला धक्का;अनेक कार्यकर्त्यांचाही प्रवेश..
मालवण दि प्रतिनिधी
वायरी- भुतनाथ गावचे माजी सरपंच घनश्याम उर्फ भाई ढोके यांनी आज अनेक सहकाऱ्यांसह माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी वायरी भूतनाथ गावचे माजी उपसरपंच व अनेक सहकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आज
ग्रामपंचायत निवडणुक पूर्वसंध्येला श्री ढोके यांनी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटासह आमदार वैभव नाईक, तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांना जोरदार धक्का बसला आहे
मालवण येथील निलरत्न या राणे यांच्या निवासस्थानी शनिवारी घनश्याम ढोके यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. याबाबतची माहिती भाजपच्या वतीने निवडणूक प्रभारी भाई मांजरेकर यांनी दिली आहे.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दाजी सावजी, दीपक पाटकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, पांडुरंग मायनाक, संदेश तळगावकर, राकेश सावंत, निषय पालेकर, रवी मालवणकर, दादू डीचवलकर, नितीन तोडणकर, बाबू कदम यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेशकर्ते घनश्याम ढोके यांच्या सोबत अखिल ढोके, निखिल ढोके, कमलेश ढोके, सर्वेश ढोके, बाळा ढोके, सागर जोशी, रमेश सारंग, बाबू खोत, सुजन सागवेकर, नाना ढोके, छगन सावजी, विराज परब, यशवंत कोळंबकर, मंदार आडकर, अरुण बटे, प्रशांत तोडणकर, कुंदन जोशी, तात्या येलकर यासह अनेक ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी बोलताना सरपंच घनश्याम ढोके यांनी गावचा सरपंच असतानाही होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या माध्यमातून विश्वासात घेतले जात नव्हते. सातत्याने हेच प्रकार घडत असल्यामुळे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र माजी जिप अध्यक्ष अशोक सावंत व माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या माध्यमातून आपण नारायण राणे साहेबांशी जोडलेला असायचो. अनेक दौऱ्यात त्यांच्या सोबत होतो. मधला काही काळ मी बाजूला गेलो मात्र आता पुन्हा जुन्या सहकाऱ्यांसोबत काम करायला मिळणार आहे. समाजासाठी आणि गावासाठी काम करत असताना सुचवलेली विकासकामे व्हावीत हीच आपली प्रमुख मागणी राहील असे ही ढोके यांनी सांगितले.
