बांद्यात श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानचे देवकार्य उत्साहात

⚡बांदा ता.१७-: बांदा येथिल श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानचे वार्षिक देवकार्य असलेला पराब उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते.

    सोमवारी सकाळी मंदिरात पुजाअर्चा तसेच लघुरुद्र करण्यात आला.त्यानंतर नैवेद्य व आरती होऊन महाप्रसाद आरंभ झाला. सायंकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. यावेळी लावलेल्या दिव्यांच्या तेजाने परिसर उजळून गेला होता. मंगळवारी सकाळपासुन विविध कार्यक्रमांना आरंभ झाला.दुपारी पारंपारीक वनभोजन कार्यक्रम व त्यानंतर श्री बांदेश्वर भेटीचा कार्यक्रम झाला.आरती,नैवैद्य,महाप्रसाद होऊन कौलप्रसाद घेऊन या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी गोवा ,कर्नाटक महाराष्ट्रासह विविध भागातून आले वाळके परिवाराचे सदस्य तसेच अनेक भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कँप्शन – (बांदा येथे श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानच्या पराब कार्यक्रमानिमित्त झालेला   दिपोत्सव सोहळा )

You cannot copy content of this page