सत्ताधारी उद्दम आमदारांना उद्या जनता मतपेटीतून नक्की उत्तर देतील

ठाकरे गटाच्या डॉ परुळेकर यांनी व्यक्त केला विश्वास

⚡सावंतवाडी ता.१७-: केंद्रापासून राज्यापर्यंत आणि पालकमंत्री ते जिल्हा नियोजन सर्वत्र आमच्याच पक्षाची सत्ता आहे. ज्या गावात आमच्या पक्षाला मतदान नाही त्या गावाचा विकास नाही, अशी उद्दामपणे धमकी देणाऱ्या आमदारांना आणि त्यांच्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता उद्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतपेटीतून नक्की उत्तर देतील, असा विश्वास डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.

या प्रसिद्धी पत्रकात परुळेकर यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या आमच्या युगपुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करणाऱ्या राज्यपालांची उचलबांगडी न करणाऱ्या पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता मतदान करेल का, असा सवालही उद्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page