बांदा शहरात पोलिसांनी केले संचलन

ग्राम पंचायत निवडणुकीच्या पाश्रवभूमीवर घेतला सराव

बांदा/प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात आज दुपारी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य संचलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, दंगल काबू नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी यांचा समावेश होता. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संचलन करण्यात आले.
बांदा कट्टा कॉर्नर येथून संचलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक, गांधीचौक, उभाबाजार, आळवाडी बाजारपेठ येथून पुन्हा कट्टा कॉर्नर पर्यंत संचलन करण्यात आले.

You cannot copy content of this page