नगराध्यक्ष संजू परब यांनी दाखविलेले अनधिकृत १३३ स्टॉल चुकीचे : जयेंद्र परुळेकर…

*💫सावंतवाडी दि.०८-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी दाखविलेले अनधिकृत १३३ स्टॉल चुकीचे आहेत . खाजगी जागेतील स्टॉल अधिकृत होऊ शकत नाही. मात्र तरीही शिवसेना म्हणून आम्ही नगरसेवक त्या स्टॉल धारकांच्या मागे उभे राहू, अशी भूमिका आज शिवसेना प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ जयेंद्र परुळेकर यांनी मांडली. तर दोन दिवसात रवी जाधव यांच्या स्टॉलबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी आदेश प्राप्त होतील. त्यामुळे जाधव यांचा स्टॉल त्या ठिकाणी त्यांना पुन्हा उभारून देऊ, असेही परुळेकर यांनी सांगितले. येथील आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात डॉ. जयेंद्र परुळेकर आणि शिवसेनेच्या नगरसेविका यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नगरसेविका शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, भारती मोरे, शिवसेना शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव आदी उपस्थित होते. परुळेकर म्हणाले, सद्यस्थितीत नगराध्यक्षांचा मनमानी कारभार सुरू आहे. विक्री झालेल्या जागेत जाधव यांच्या स्टॉलसह आणखीन सात स्टॉल आहेत. मात्र केवळ त्यांच्यावरच पालिकेकडून अन्याय करण्यात आला आहे. हा अन्याय नेमका कशासाठी? त्यांना अनधिकृत पैशांची अपेक्षा आहे का?, असा सवाल उपस्थित केला. आज बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी येणाºया ग्रामीण भागातील महिलांना बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांच्यावर रस्त्यावर फिरून भाजी विकण्याची वेळ येत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बसण्याची जागा उपलब्ध करून देऊ, त्यासाठी दुसरीकडे त्यांच्यासाठी विशेष आठवडा बाजार सुरू करू. असेही परूळेकर म्हणाले. आज ज्या १३३ अनधिकृत स्टॉल बाबत नगराध्यक्ष बोलताहेत ते अनधिकृत स्टॉल गेले तीस-पस्तीस वर्षापासून आहेत. हे स्टॉल खाजगी जागेतीलही आहेत. त्यामुळे खासगी जागेतील स्टॉल अनाधिकृत होत नाहीत. संजू परब यांना चुकीची माहिती मिळाली असून ते चुकीचे बोलत आहेत. मात्र काही झाले तरी त्या १३३ स्टॉलवर आम्ही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. नगराध्यक्षांच हे फुटक राजकारण शहराला राडा संस्कृतीकडे घेऊन चालले आहे. आज शहराचा जो विकास झाला आहे तो आमदार दीपक केसरकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून आहे. त्यामुळे शहराला एक प्रकारे चालना मिळाली आहे. मात्र शहरात बॅनरबाजी करणाºया सत्ताधाºयांनी माजी राज्यमंत्री आणि राज्यसभा खासदार यांनी शहरासाठी किती निधी दिला हे सांगावे. माजी नगरसेवक पेडणेकर म्हणाले, नगराध्यक्ष यांनी जाहीर केलेले अनधिकृत १३३ स्टॉल किती खरे आणि किती खोटे आहेत हे दाखवावेत. शरद तलावाच्या काठी त्यावेळी असलेले स्टॉल हटवून त्यांचे पुनर्वसन इंदिरा गांधी संकुलात करण्यात आले. ज्यांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांना संकुलाच्या मागे स्थलांतरित करण्यात आले. भविष्यात त्यांना भाजी मंडईच्या जागेवर उभे राहणाºया कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र असे असतानाही स्टॉल बाबत चुकीची माहिती नगराध्यक्ष देत आहेत.

You cannot copy content of this page