⚡वेंगुर्ला ता.१५-: पहिली मास्टर्स योगासन चॅम्पियनशिप ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धा १० व ११ डिसेंबर रोजी झुम अॅपवर सिनिअर अ, ब व क अशा गटात घेण्यात आली. सिनिअर ब गटात वेंगुर्ला येथील किरण दिनकर ताम्हणकर हे राज्यातील पहिल्या दहामध्ये येऊन त्यांनी आठवा क्रमांक पटकाविला.
किरण ताम्हणकर यना वेंगुर्ला येथील योगा शिक्षक वसुधा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्या नियमानुसार व मार्गदर्शनाखाली आर.व्हाय.एस.ए.सोसायटीद्वारे पहिली मास्टर्स राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् चॅम्पियनशीप २०२२-२३ ही स्पर्धा १० व १२ जानेवारी रोजी
अटल बिहारी वाजपेयी मल्टीपर्पज इनडोअर हॉल, राजस्थान येथे होणार आहे. यात पहिल्या तिघांची निवड झाली आहे.
