⚡वेंगुर्ला ता.१५-: कल्याण येथे १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मुंबई विद्यापिठ इंटर झोन योगा स्पर्धेत मुलींच्या गटातील संघाने (कोकण झोन) रौप्यपदक प्राप्त केले आहे. या संघात मारिया डिसोझा, सिद्धी साळगांवकर, शामिनी फर्नांडीस तर मुलांच्या गटातील संघात अमोल सावंत, सुनिल काळे, हर्षल आरोलकर, ऋषिकेश परब, सर्वेश तुळसकर या खेळाडूंनी ब्राँझ पदक प्राप्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, सचिव जयकुमार देसाई, अध्यक्ष मंजिरी मोरे-देसाई, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.जे.वाय.नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. जिमखाना सदस्य प्रा.डी.आर.आरोलकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा.वसंत नंदगिरीकर, प्रा.कमलेश कांबळे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
