कणकवलीत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची पडताळणी

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायती पैकी ९ सरपंच बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असून ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर ३५९ सदस्य पदासाठी ७३५ उमेदवार रिंगणात आहे. आता मतदान प्रक्रिया १८ डिसेंबरला होणार असल्याने निवडणूक विभागाची लगबग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची पडताळणी करण्यात आली आहे.त्यात १८८ बूथ वरील कंट्रोल युनिट आणि ३७६ बॅलेट युनिट रिसेट करत जुना डाटा डिलीट करण्यात आला आहे. त्यात बंद मशीन बाजूला करण्यात आल्या.आता १५ डिसेंबरला त्या युनिटमध्ये उमेदवारांच्या समोर नावे व चिन्ह सेट करण्यात येणार आहे.

कणकवली निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.१८ ऑक्टोबरला ४९ ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील होणारी मतदान शांततेत होण्याच्या दृष्टीने निवडणूक विभागाचा प्रयत्न आहे. मतदान प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तपासून घेत रिसेट केल्या गेल्या आहेत. ज्या मशीन बंद आहेत. त्या बाजूला करून तसा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. अत्यावश्यक लागणारी यंत्रसामुग्री सज्ज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुका निवडणूक निर्णय अधिकारी ते बूथस्तरीय निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा कार्यरत आहे.

You cannot copy content of this page