महात्मा गांधी विद्यालय श्रावणचे बालकला क्रीडा महोत्सवात यश

⚡कणकवली ता.१४-: आचरा प्रभागस्तरीय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन 2022 त्रिंबक हायस्कूल येथे झाला. या महोत्सवमध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या शाळेने घवघवीत यश संपादन करून आपल्या यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.
यामध्ये खो-खो लहान गट मुली प्रथम ,खोखो मोठा गट मुली व मुलगे दोन्ही प्रथम, समूह गान लहान व मोठा गट दोन्ही प्रथम
उंच उडी मोठा गट मुली रेवती सुनील लाड द्वितीय, लहान गट मुली 50 मीटर धावणे ऋतिका रुपेश परब द्वितीय, तर वैदेही संतोष जाधव तृतीय ,
100 मीटर धावणे मोठा गट मुलगे वेदांत पांडुरंग परब, तृतीय
मोठा गट मुलगे उंच उडी वेदांत पांडुरंग परब तृतीय, मोठा गट मुलगे गोळा फेक कृणाल नारायण परब तृतीय ,मोठा गट मुली लांब उडी रेवती सुनील लाड तृतीय,
मोठा गट मुली 200 मीटर धावणे वैष्णवी मंगेश यादव तृतीय, मोठा गट मुली उंचउडी भक्ती नागेश परब तृतीय ,लहान गट मुलगी खो-खो उपविजेता, मोठा गट मुलगे रीले उपविजेता मयुरेश मंगेश दळवी, ओमकार सुनील लाड, सदाशिव अनंत परब, वेदांत पांडुरंग परब.
मोठा गट मुली रिले उपविजेता निमिषा शिवराम परब, निरजा संजय परब, संजीवनी सतीश बाईत, रेवती सुनील लाड.
लहान गट मुली रिले उपविजेता ऋतिका रुपेश परब, नव्या सुरेश राणे, हर्षदा समीर वेदरे, वैदेही संतोष जाधव.
मोठा गट मुलगे कबड्डी उपविजेता
मोठा गट ज्ञानी मी होणार उपविजेता रेवती सुनील लाड, भक्ती नागेश परब ,मोठा गट समूह नृत्य उपविजेता. तर तालुकास्तरीय मुलग्यांच्या कबड्डी मोठ्या गटासाठी श्रावण शाळेतील वेदांत पांडुरंग परब, कृणाल नारायण परब, राजाराम प्रकाश परब, अथर्व संतोष गवळी, ओंकार सुनील लाड तर मुलींच्या कबड्डी मोठ्या गटामध्ये रेवती सुनील लाड व लहान गटामध्ये वैदेही संतोष जाधव, रिया प्रकाश यादव या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे आचरा प्रभागाचे विस्तार अधिकारी उदय दीक्षित, श्रावण केंद्राचे केंद्रप्रमुख देवू जंगले, त्रिंबक हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ व श्रावण गावातील ग्रामस्थ या सर्वांकडून मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे.
या यशामध्ये सुदर्शन परब, संजय उर्फ भाई परब, दिपेश परब, समृध्दी परब, अर्चना सुनील लाड, नागेश परब, उमेश श्रावणकर, गजानन परब, मिलिंद परब, जितेंद्र लाड, रोहिणी पवार, सुवर्णा दळवी, बापू परब, नारायण परब, पळसंब शाळेचे विनोद कदम , आडवली शाळेचे राजीव तावडे हे सहाय्यभूत ठरेल आहेत. या यशामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले आहे.

You cannot copy content of this page