वाळू आंदोलनातील आरोपातून आमदार वैभव नाईक यांच्यासह २१ जणांची निर्दोष मुक्तता…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* वाळू व्यवसायिकांच्या न्याय हक्कांसाठी मालवण येथे करण्यात आलेल्या वाळू आंदोलनात तहसीलदारांना धमकावल्या प्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी असलेल्या आरोपातून आमदार वैभव नाईक यांच्यासह २१ जणांची जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आमदार वैभव नाईक, बबन शिंदे, संजय पडते, यतीन खोत, अभय शिरसाट, नंदू गवंडी, संतोष गावकर, पंढरीनाथ हडकर, गणेश तोंडवळकर, योगेश भिसळे, अरुण खोत, रुपेश खोत, सतीश प्रभू, दिनेश साळकर, कल्याण पाटील, हर्षद गावडे, सोमनाथ लांबोर, स्वप्नील पेडणेकर, शेखर तोंडवळकर, संतोष पाटील, राजेश शेट्ये या २१ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी आरोपींच्या वतीने अँड उल्हास कुलकर्णी, अँड उमेश सावंत यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page