*दोन लेंडिग यशस्वी झाल्याने आय आर बी कंपनीने केले आयोजन; खासदार राऊत यांची माहिती*
*💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* चिपी विमानतळावर काल दोन लॅंडिंग ट्रायल झाल्या. त्या दोन्ही यशवी झाल्या. त्यामुळे आयआरबी कंपनीने उद्घाटनाचा कार्यक्रम १ मार्च रोजी आयोजित केला आहे, अशी माहिती खा विनायक राऊत यानी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खा राऊत यानी नारायण राणे यानी ‘शिवसेना विकासाला पहिली विरोध करते नंतर श्रेय घेते’ या केलेल्या आरोपावर उत्तर देताना ‘शिवसेना विकासाच्या कधीच विरोधात नव्हती. मात्र, विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या लुबाडणुकीला आमचा विरोध होता. सी-वर्ल्ड प्रकल्प साडे तिनशे एकर जागेत होत असताना तेराशे एकर जागा आरक्षित केली होती. उर्वरित जागेत राणे कुटुंबिय हॉटेल उभारणार होते. त्याचा पुराव्यानिशी पोलखोल आ वैभव नाईक यानी त्यावेळी केला होता. चिपी विमानतळसाठी लागणाऱ्या जागेच्या व्यतिरिक्त ९३७ हेक्टर जागेत कमर्शियल म्हणून पेन्सिल नोंद करण्यात आली होती. त्यासाठी दादागिरी सुरु होती. त्याला आमचा विरोध होता. ताज हॉटेल नारायण राणें यानी मंजूर केले होते. परंतु त्यावेळी विरोध झाला. आता आम्ही सर्व्हे नंबर ३९ वगळून गावठान जागेत ताज हॉटेल उभारत आहोत, असेही यावेळी खा राऊत यानी सांगितले.
