*केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा फक्त शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठीच

*खासदार विनायक राऊत यांची खरमरीत टीका*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०८-:* सिंधुदुर्गात आलेले केंद्रीय गृहमंत्री सिंधूदुर्ग, महाराष्ट्राला काहीतरी देतील, त्या अनुषांगिक बोलतील. केंद्राकडे महाराष्ट्राचे जीएसटीचे अडकलेले साडे सत्ताविस हजार कोटी तसेच अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती मदतीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो कोटी रूपयांच्या प्रस्तावावर बोलतील, असे अपेक्षित होते. मात्र, त्यांचा दौरा केवळ शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर तोंडसुख घेण्यासाठीच आयोजित होता, असे त्यांच्या भाषणावरुन स्पष्ट होत आहे, अशी खरमरीत टिका शिवसेना सचिव खा विनायक राऊत यानी सोमवारी अमित शहा याच्यावर पत्रकार परिषदेत केली. तळगाव येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत खा राऊत यानी गृहमंत्री शहा याचा खरपुस समाचार घेतला. रविवारी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यास आलेल्या शहा यांना शिवसेना आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे विषयच सापडला नाही. अर्थात देशाच्या गृहमंत्री यांना मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची वेळ येते. यातच मुख्यमंत्री ठाकरे यांचे यश आहे, अशी खोचक टिपणी सुद्धा यावेळी खा राऊत यानी लगावली. यापुढे जावून खा राऊत यानी ‘स्वार्था पुरते दुसऱ्याला वापरून घ्यायचे आणि विश्वासघात करायचा, अशी ख्याती आहे. अटलबिहारी, प्रमोद महाजन यानी ३३ पक्षांचा समन्वय साधुन स्थापन केलेल्या एनडीए मधील अकाली दल सारखे पक्ष मंत्री पदाचा त्याग करून गेले. सर्वच पक्ष सोडून गेले असून एनडीएमध्ये केवळ भाजप उरणार आहे. यावरून कृतघ्न कोण ?’ हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page