*उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून मध्यरात्री नंतर केली कारवाई
*💫बांदा दि.०८-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दोन स्विफ्ट कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत कारसह गोवा बनावटी दारूचे १३३ बॉक्स जप्त करण्यात आले असून, ही कारवाई काल मध्यरात्री नंतर अडीचच्या सुमारास मळेवाड सातार्डा मार्गावर आरोस येथे करण्यात आली आहे.
