बिबट्याने गाईवर केला हल्ला केल्याने तिचा मृत्यू

कुर्ली येथील घटना:१५ हजारांचे नुकसान

⚡वैभववाडी ता.०३-: कुर्ली खडकदारा येथील शेतकरी श्री धाऊ मानू शेळके (६७ वर्षं ) यांनी नेहमी प्रमाणे आपली जनावरे जंगलात सोडली असता दि. ०३ डिसेंबर रोजी ठीक दुपारच्या दरम्यान बिबट्याने गाई वर हल्ला केल्याचे दिसून आले. व गाईच्या शरीराचा काही भाग काही शेतकऱ्याच्या दिसून आला.

त्या मध्ये अंदाजित सदर शेतकऱ्यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनखात्याशी संबंध साधला असता आज सुट्टी असल्या मुळे संपर्क होवू शकला. नाही त्या मुळे सदर शेतकऱ्याचे अचानक ओढवलेल्या या नुकसानी मुळे स्थानिक लोकांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे.
तेंव्हा लवकरात वनखाते व संबंधित प्रशासन यांनी त्यांचे नुकसान भरपाई त्वरीत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे

You cannot copy content of this page