जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत वराडकर हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुली ठरल्या अजिंक्य

विभाग स्तरावरील खोखो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार.

⚡मालवण ता.०३-: जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाने विजेतेपद पटकावले. हा संघ विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे

१४ वर्षाखालील गटात प्रत्येक तालुक्यातून मिळून एकूण आठ संघ सहभागी झाले होते .या सर्व संघावर मात करत वराडकर हायस्कूल कट्टयाच्या विद्यार्थिनींनी अजिंक्यपद पटकावले. या संघात प्रतीक्षा पवार सानिका मोंडकर मेघा बागवे, सानवी बागवे, ममता थवी, माऊली थवी,कृतिका लोहार,दक्षिणा गावडे हर्षिता गावडे,आर्या फोपळे, अनुष्का नलावडे या विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला,या संघाला क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर, किसन हडलगेकर, रामकृष्ण सावंत, भूषण गावडे यांनी मार्गदर्शन केले. वराडकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी बंडू सावंत यांनी या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे , कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अॅड. एस .एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर , उपाध्यक्ष श्री. आनंद वराडकर,सचिव श्री सुनील नाईक,श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर , शालेय समिती अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे मुख्याध्यापक श्री संजय सुभाष नाईक ,पर्यवेक्षिका सौ .गावडे मॅडम व सर्व सहकारी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page