‘केपीएल’चे शानदार उद्घाटन….

दोन दिवस सुरू राहणार स्पर्धा; आठ संघांचा समावेश; वायरमन दीपक नाईक यांना वाहिली श्रद्धांजली

*💫बांदा दि.०६-:* पाडलोस केणीवाडा येथील राम मंदिर श्री राष्ट्रोळी क्रिकेट संघ, केणीवाडा आयोजित ‘केणीवाडा प्रीमियर लिग 2021’च्या स्पर्धांचे शानदार उद्घाटन होऊन स्पर्धांना सुरूवात झाली आहे. आरोस गावातील वायरमन दीपक नाईक यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केपीएल स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आहे. शनिवार 6 व रविवार 7 फेब्रुवारी असे सलग दोन दिवस सामने रंगणार आहेत. शनिवारी सकाळी ‘केपीएल’चे उद्घाटन भाजपा सावंतवाडी युवामोर्चा चिटणीस काका परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, शिवसेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, उपसरपंच महादेव गावडे, पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, ग्रा.पं.माजी सदस्य हर्षद परब, पोलिस पाटील रश्मी माधव, सामाजिक कार्यकर्ते बंडो कुबल, गणेश नानचे, आनंद जाधव, अनंत नाईक तसेच सर्व खेळाडू, आयोजक व ग्रामस्थ उपस्थित होते. केपीएल स्पर्धांत देव बॉईज(संघ मालक-बाळा परब), फ्रेंडशिप-11(गणेश नानचे), दुर्गा स्पोर्टस्(अक्षय आनंद जाधव), त्रिमुर्ती-11( पिंटो नाईक), श्री देवी भराडी स्पोर्टस्(महेश कुबल), अथर्व स्पोर्टस्(मोहन पालेकर), सातेरी भद्रकाली वॉरिअर्स(अमोल नाईक), सातेरी भद्रकारी रॉकर्स( समीर नाईक व रंजन नाईक) असे संघ व मालक आहेत. दिवसभरात आठ सामने खेळविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

You cannot copy content of this page