मुंबई-गोवा महामार्गावर खडी…

वाहतूक करणाऱ्या डंपरचा फाळका सुटला;वाहतूक पोलीस विजय जाधव यांनी घेतली घटनास्थळी धाव; वाहतूक केली सुरळीत

*💫बांदा दि.०६-:* मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली-आरटीओ नाक्यानजीक खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठीमागील हौद्याचा फाळका सुटल्याने खडी महामार्गावर तब्बल १०० फूट विखुरली गेली. यामुळे झारापहुन बांद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. वाहतूक पोलीस विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. महामार्गावर विखुरलेली खडी बाजूला करण्याचे काम सुरू आहे. ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. डंपर चालक इन्सुलीहुन बांद्याच्या दिशेने खडीची वाहतूक करत होता. हौद्याचा मागील फाळका अचानक उघडल्याने खडी रस्त्यावर विखरून पडली. पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांनी याची कल्पना डंपर चालकाला दिली. तोपर्यंत १०० फूट खडी महामार्गावर विखुरली गेली. बांद्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली. विजय जाधव यांनी वाहतूक सुरळीत केली. खडी बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

You cannot copy content of this page