माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे
*💫ओरोस दि.०६-:* जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं हे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा खुप आनंद होत आहे. अशी भावना माझी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवेची कमतरता असल्याने आणि येथील रुग्णांना बाहेर जावे लागू नये यासाठी मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचे ठरवले आणि आमची एस एस पी एम ही संस्था या मेडिकल कॉलेजचा कामाला लागली आणि अवघ्या ४ वर्षात ते स्वप्न पूर्ण होत आहे. परंतु हे मेडिकल कॉलेज बांधताना अनेक प्रकारचे विरोध झाले. शिवसेनेने तर नारायण राणे बेकायदेशीर काहीतरी करत आहेत अशा बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतु आम्ही सर्व प्रकारची परवानगी घेऊनच काम सुरू केले होते. हे मेडिकल कॉलेज जरी जंगली भागात जरी असले तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुख सोयींची निर्मिती केली असून, विद्यार्थांना कुठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
