*स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान जनजागृतीसाठी उद्या सावंतवाडीत सायकल रॅली

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.०६-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले असून, सदर रॅली उद्या रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:१५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. ही रॅली शिव उद्यान येथून सुरू होणार असून पुढे ती, लेस्टर गेट- कोर्ट मारुती मंदिर – बसस्थानक – गवळी तिठा – कोलगाव दरवाजा – उर्दू हायस्कूल – लतिफ बेग घर – परुळेकर हॉस्पिटल – आत्मेश्वर मंदिर – होळीचा खुंट – साटेलकर गिरण – कशाळीकर दवाखाना – मिलग्रीस हायस्कूल – शिरोडा नाका – फॉरेस्ट ऑफिस – टोपीवाला स्मारक तंत्रविद्यालय – कारागृह ते पुन्हा शिव उद्यान अशी निघणार आहे.

You cannot copy content of this page