पेंडुर-दुकानवाड येथील आंबा व काजू बागायतीस आग लागून लाखोंचे नुकसान…

*💫वेंगुर्ले दि.०५-:* तालुक्यातील पेंडुर दुकानवाड येथील शेतकऱ्यांच्या आंबा व काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान झाले.आग लागून काजू कलम तसेच आंबा कलम जळून शेतकऱ्यांचे प्रथमदर्शनी बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. या आगीत लक्ष्मण जगन्नाथ सातार्डेकर व जयराम मांजरेकर या शेतकरी बागायतदारांची जवळ जवळ दोनशे काजू कलम तसेच आंबा कलम जळून खाक झाली. ही आग आजूबाजूच्या परिसरात जाऊन मोठे नुकसान होणार होत, मात्र ग्रामस्थांना आग लागल्याचे कळताच त्यांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. यात जयराम मांजरेकर, बळी सातार्डेकर, नाना गावडे, राजन मांजरेकर, प्रेमानंद तांडेल, वामन मेस्त्री, गोटया तांडेल, पांडुरंग तांडेल, ज्ञानेश्वर मांजरेकर, सुनील गावडे, महेश तांडेल आदी ग्रामस्थानी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. घटनेचा पंचनामा तलाठी गुरव यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत कोतवाल शेटकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश वैद्य, रोहन वैद्य, ग्रामपंचायत सदस्या सुहासिनी सातार्डेकर, जयराम मांजरेकर, बळी सातार्डेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page