देवगडः पेटड्ढोल डिझेलच्या दरवाडीच्या विरोधात देवगड तालुका शिवसेनेच्यावतीने देवगड शिवसेना कार्यालय ते देवगड तहसिलदार पर्यंत मोर्चा काढुन केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत देवगड तहसिलदारांना पेटड्ढोल डिझेलचे दर तात्काळ शासनाने कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर,मिqलद साटम,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर,अमोल लोके,रqवद्र जोगल,निनाद देशपांडे,विष्णू घाडी,शिवदास नरे ,तुषार पेडणेकर,संतोष तारी,लक्ष्मण तारी आदी उपस्थित होते. निवेदनामध्ये असे नमुद केले आहे कि, पेटड्ढोल डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठण्याच्या स्थितीमध्ये असून महागाईचा भडगा आणखीनच भडकणार आहे. यामुळे देशातील सर्व जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. शिवसेना पक्ष देशातील सर्व सामान्य नागरिकांच्या महागाईच्या विरोधात पाठीशी ठामपणे उभी असून पेटड्ढोल डिझेल दरवाड हे आंदोलन छेडत असल्याचे निवेदनामध्ये नमुद केले आहे. जगात सर्वाधिक पेटड्ढाल डिझेलचे दर हे भारतात आहे. मोदी सरकार आल्यापासून सातत्याने पेटड्ढाल डिझेलचे दरवाढ सुरु आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळातून जनतेची सुटका होत असताना आता कोरोना विषाणू पेक्षा केंद्र सरकारची पेटड्ढोल डिझेलवाढ हि सर्व सामान्य जनतेला घातक आहे. यामुळे महागाईचा भडका संपुर्ण भारत देशामध्ये पसरत असून पेटड्ढाल डिझेलचे वाढते दर कमी केले नाही तर जनतेला जीवन जगणे कठिण होवून बसणार आहे. यामुळे केंद्र सरकारने तात्काळ पेटड्ढोल डिझेलच्या किमती कमी करुन जनतेला दिलासा दयावा अशी मागणी मोर्चा आंदोलन छेडून देवगड तहसिलदारांना निवेदनाव्दारे शिवसेना देवगड तालुक्याच्यावतीने करण्यात आली आहे. \ोटो- तहसिलदार देवगड यांना निवेदन देताना देवगड तालुका शिवसेना पदाधिकारी छायाःवैभव केळकर
इंधन दरवाढी विरोधात देवगड मध्ये शिवसेनेचा मोर्चा
