*शिवप्रेमी सिंधुदुर्ग व समविचारी संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्लॅस्टिक मुक्ती मोहिमेचे आयोजन

जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन

*💫कुडाळ दि.०६-:* सिंधुदुर्ग शिवप्रेमी व समविचारी संघटना यांच्या वतीने उद्या रविवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग किल्ला येथे प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानास जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानात सामील होण्यासाठी उद्या सकाळी किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचे नियोजन करण्यात आले असून, ठीक ८ वाजता जेठीवर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यासाठी दिलेल्या क्रमांकावर नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच साफ सफाई साठी लागणारे साहित्य स्वतः आणण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी रमाकांत नाईक – ८०८७८७०६८२ आणि प्रभाकर परब – ९६०७३८१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page