ऑल इंडिया जर्नालिझम फाउंडेशनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांची नियुक्ती

सावंतवाडी-: ऑल इंडिया जर्नालिझम फाऊंडेशनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची नियुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश कुमार बापट यांनी केली आहे. सिताराम गावडे गेली तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रात काम केले आहे. तसेच स्वतःच्या संपादनाखाली साप्ताहिक आमची एकजूट व कोकण लाईव्ह ब्रेकिंग यू ट्यूब न्यूज चॅनेल चालवीत आहेत. अनेक सामाजिक संघटनातही ते सक्रिय सहभागी असतात अनेक संस्थांवर ते पदाधिकारी आहेत,त्यांच्या यि निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page