सांगवेतील भाजपा कार्यकर्ते शिवसेनेत

⚡कणकवली ता.२६-: सांगवे गावातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. सांगवे घोसाळवाडी येथील या कार्यकर्त्यांचे कनेडी शिवसेना शाखा येथे महिला जिल्हा प्रमुख निलम सावंत-पालव यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
सांगवे घोसाळवाडीतील आग्नेल सालू घोन्साल्वीस, रुजाय साहेर फर्नांडिस, शारदा गणेश भोगटे, लिना घोन्साल्वीस, नॅन्सी फर्नांडिस, विठ्ठल गणेश भोगटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शिवसेना अल्पसंख्याक सेल, उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना उपतालुकाप्रमुख राजू पाटील, मुकेश सावंत, तुषार गावकर, प्रदीप सावंत, दिव्या साळगावकर, पदमाकर पांगम, बाळा पाटकर, योगेश वाळके, सुदर्शन रासम, आर.एच. सावंत, अर्जुन कांबळे, भाग्योदय कांबळे, शिवप्रसाद तेंडोलकर, गणेश शिवडावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page