भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भव्य रॅली काढून स्वागत

⚡कणकवली ता.२६-:
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे स्वागत आम.नितेश राणे यांनी केले. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघात वागदे गणपती मंदिर ते वृंदावन हॉल कलमठ पर्यंत काढलेल्या मोटर सायकल रॅलीत शेकडो मोटारसायकल व भाजपाचे झेंडे सामील झाल्याने भाजपामय वातावरण निर्माण झाले होते.

आमदार नितेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही स्वतः बुलेटस्वार होत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.त्यांच्या मागे आमदार नितेश राणे बसले होते. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत यांच्या दुचाकी वर प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बसल्या हे लक्षवेधी होते.

या रॅलीत आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जि. प.माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, उत्तम बिर्जे, सावी लोके, अफरोज नवलेकर, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, प्राची कर्पे, संजना सदडेकर, मेघा गांगण, किशोर राणे, माजी सरपंच संदीप सावंत, संतोष पुजारे, समीर प्रभूगावकर, समीर सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, संदीप मेस्त्री, सोनू सावंत, आनंद सावंत, समीर प्रभूगावकर, गणेश तळगावकर आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने मोटरसायकल स्वार या रॅली सहभागी झाले होते. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

You cannot copy content of this page