निरवडे संस्कार स्कूल येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
⚡सावंतवाडी ता.२५-: आज शालेय विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास साधावा तसेच आपले नाव तसेच जिल्ह्याचे नाव लौकीक करावे असे मत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल(साई होली फेथ हायस्कूल) मार्फत आयोजित क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
यावेळी ते म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धात्मक उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचा विकास साधावा शैक्षणिक, क्रीडारात्मक उपक्रमात सहभाग घेऊन आपले कला गुण विकसित करावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले .यावेळी संस्कार नॅशनल स्कूल चे (साई होली फेथ हायस्कूल)अध्यक्ष शेखर जैन यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांनी संस्कार नॅशनल स्कूल (साई होली फेथ हायस्कूल)हे ग्रामीण भागातील आदर्शवत स्कूल आहे. शहरी भागाप्रमाणे विद्यार्थ्यांना चांगले दर्जात्मक शिक्षण देण्याचे काम ही संस्था करत आहे, आज ग्रामीण भागातील दर्जात्मक शिक्षण देणारी दर्जात्मक शिक्षण देणारे ही संस्था आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळे संस्कार नॅशनल हायस्कूल(साई होली फेथ हायस्कूल) मार्फत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन दोन दिवसाचे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन वेळीं संस्कार नॅशनल स्कूलचे अध्यक्ष शेखर जैन,निरवडे गावचे सरपंच हरि वारंग, निरवडे गावचे स्वच्छता कमिटी अध्यक्ष धर्माजीउर्फ दाजी गावडे, संस्कार नॅशनल स्कूलकमिटी(साई होली फेथ हायस्कूल) हेड कमिटी मेंबर जया भारती, सोनुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक गोविंद मोरये, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष भक्ती भिसे, गौरी माळकर देऊ गावडे ,संगीता पटेल उपमुख्याध्यापक हेमंत तानावडे, तसेच शाळेचे शिक्षक कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष सावंत व सूत्रसंचालन नंदिनी नेमण यांनी केले. संस्कार नॅशनल स्कूल मार्फत वर्षभरात विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते .यावर्षी या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी ,धावणे, रीले खो खो ,गोळा फेक ,फनी गेम, हॉलीबॉल ,अशा विविध क्रीडात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ,तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .याला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे कार्यक्रम दोन दिवस चालणार आहेत .शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला चालना देण्यासाठी स्कूल मार्फत विविध उपक्रम वर्षभरात राबवले जाते.
