⚡वेंगुर्ला ता.२५-: येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या शालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलच्या मुलामुलींनी घवघवीत यश मिळविले. १४ व १६ वर्षाखालील गटात मुले आणि मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या मुलांना क्रिडा शिक्षक संदेश रेडकर, राधाकृष्ण पेडणेकर व सॅमसन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मुख्याध्यापक फादर आंतोन डिसोजा यांच्यासह पालकांनीही अभिनंदन केले आहे.
फोटाओळी – तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलच्या विद्यार्थ्यांना यश मिळविले.
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलचे वर्चस्व
