चित्ररथ,फुड फेस्टीवल,हिंदी मराठी सेलिब्रेटीचे होणार कार्यक्रम
⚡कणकवली ता.२५-: खवय्यांसाठी मेजवानी असणारा फूड फेस्टिवल, आकर्षक चित्ररथ, हिंदी व मराठी गायकांचा ऑर्केस्ट्रा, हास्य कलाकारांचा कॉमेडी शो आणि हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीने बहरणारा कणकवली पर्यटन महोत्सव गुरुवार 5 जानेवरी ते रविवार 8 जानेवारी या चार दिवसांत होणार आहे. कोविड संकटामुळे गेले दोन वर्षे हा पर्यटन महोत्सव होऊ शकला नव्हता मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात हा पर्यटन महोत्सव होणार असून त्यासाठी नगरपंचायतीचा एक रुपया खर्च केला जाणार नाही तर आम. नितेश राणे व आमच्या मित्र मंडळाच्या माध्यमातून हा महोत्सव होईल अशी माहिती कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगर पंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,अण्णा कोदे,विराज भोसले, राजश्री धुमाळे,मेघा गांगण, प्राची कर्पे, संदीप नलावडे,किशोर राणे, बंडू गांगण राजू गवाणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ 5 जानेवारीला भव्य शोभायात्रेचे होईल,त्या निमित्ताने 4 जानेवारी रोजी लहान व मोठ्या मुलाच्या चित्रकला स्पर्धा नगरवाचनालय हॉल येथे होणार आहे.या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नामांनद मोडक यांच्याशी संपर्क साधावा. या महोत्सवात स्टॉलसाठी गटनेते संजय कामतेकर यांच्याकडे संपर्क साधावा. दुसऱ्या दिवशी 5 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा व चित्ररथ सायंकाळी 5 वाजता पटकीदेवी मंदिर ते ढालकाठी मार्गे, आप्पासाहेब पटवर्धन चौक ते महोत्सव स्थळापर्यंत म्हणजेच उपजिहा रुणालय समोरील मैदानापर्यंत जातील.यात 17 वॉर्ड मधील 17 चित्ररथ सहभागी होणार असून चित्रथाना आर्थिक मदत दिली जाणार आहे.नगरपंचायत कणकवली व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून कार्यक्रम स्थळी फुड फेस्टीवल उदघाटन कार्यक्रम सांय 6.30 वाजता होणार आहे.
तसेच चित्रकला स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
कणकवली पर्यटन महोत्सव 2023 कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ. नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत सांय 7.30 वाजता होणार आहे.रात्री 8 वाजता मुंबई येथील ऑर्केस्ट्रा आणि टी.व्ही. मधील कलाकारांचा धमाल कॉमेडी शो होणार आहे.
तिसऱ्या दिवशी 6 जानेवारी रोजी सायं.6 ते 8 यावेळेत 15 वर्षाखालील मुलाचा सहभाग असलेला फॅशन शो होईल.तसेच रात्री 8 वाजाता आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने कणकवली शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील भरगच्च 200 नामवंत कलाकारांसहीत संगीत, नृत्य व कॉमेडी असा रंगीत कार्यक्रम सुहास वरुणकर, संजय मालंडकर व प्रा.हरीभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम होईल.
तसेच 7 जानेवारी तिसऱ्या दिवशी मराठी कलाकारांचा कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम व संगीत रजनी (म्युझिकल नाईट) सांय 8.00 वाजता होणार आहे.
शेवटच्या दिवशी 8 जानेवारीला कणकवली पर्यटन महोत्सव 2023 कार्यक्रमाचा समारोप समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे , विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर , आमदार नितेश राणे व इतर मान्यवर यांच्या उपस्थित राहणार आहे.त्यानंतर हिंदी कलाकारांचा व सेलिबेटींच्या उपस्थितीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सांय 8 वाजता होणार आहे,असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
