⚡कणकवली ता.२४-: मालवण तालुक्यातील रामगड गावची सुरभी सुरेश कडुलकर हिने सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर परीक्षेत यश संपादन करून क्लास टू ऑफिसर पद मिळवले .
2021 मध्ये झालेल्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेत घवघवीत यश मिळवत काल झालेल्या निवड यादीत तीने आपल स्थान पक्क केल.
युनिक अकॅडमी कणकवली येथे स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतल्यानंतर तीने अथक परिश्रम घेत अभ्यास सुरु ठेवला.कोरोनो च्या परिस्थिती मुळे परीक्षा लंबणीवर पडल्या होत्या. त्या परिस्थतीवर जिद्दीने मात करत अभ्यासातलं सातत्य आणि मनावरचा संयम कायम ठेवून तीने हे यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने युनिक अकॅडमी कणकवली सातत्याने कार्यरत असून अनेक विद्यार्थी आज सरकारी सेवेत आहेत . क्लास टू ऑफिसर झालेल्या सुरभी कडुलकर हिच्या यशाने जिल्ह्या मध्ये हा पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला आहे की, पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. आपल्या गावातच राहून ही यश मिळवता येते. तेंव्हा जिल्ह्यातील विद्यार्थी पालक यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळले पाहीजे तेंव्हाच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे असे मत युनिक अकॅडमी कणकवलीचे संचालक सचिन कोर्लेकर यांनी व्यक्त केले.
