सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार ; ठेकेदारांच्या अरेरावीमुळे प्रश्न सुटत नाही
सावंतवाडी ता. २४: येथील बीएसएनएल कार्यालयात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न ठेकेदारांच्या अरेरावीमुळे सुटत नसल्याने आता याकडे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात येणार आहेत, असा इशारा सावंतवाडी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.
