बांदा येथील किल्ले बनविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळीचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन

⚡बांदा ता.०१-: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे दिवाळीचे औचित्य साधून स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. १५ वर्षाखालील व खुल्या गटात बांदा शहर मर्यादित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. १५ वर्षाखालील गट- प्रथम क्रमांक – कु. साईशा आणि कु. प्रज्वल केसरकर (प्रतापगड), द्वितीय क्रमांक – गौरांग भांगले (लोहगड), तृतीय क्रमांक – शंकर आरोलकर (मल्हारगड). १५ वर्षावरील गट- प्रथम क्रमांक – श्री गणेश मूर्ती शाळा बांदा-निमजगा (किल्ले जंजिरा), द्वितीय क्रमांक – गवळीटेम्बवाडी (किल्ले पन्हाळा आणि विशाळगड), तृतीय क्रमांक – मेदिनी परब (किल्ले जंजिरा). दोन्ही गटात ४० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
विजेत्या स्पर्धकांना लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, कार्यवाह समीर परब, खजिनदार भूषण सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page