⚡कणकवली ता.०१-: स्वयंदिप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीमार्फत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत कणकवली नगरवाचनालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी अच्युत देसाई हे तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तिमत्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत.
आजपर्यंत अनेक कार्यशाळांमधून त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले आहे. गणित आणि बुद्धिमत्ता या सारख्या अवघड विषयातील अनेक क्लृप्त्या सहजरित्या कशा सोडवाव्यात याचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या या अनुभवाचा लाभ आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी घेतला आणि स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केले. ही संधी मुलांना मिळावी या हेतूने ट्रस्ट मार्फत खास इंग्रजी आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंदिप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीचे संदीप सावंत (9421235839) यांनी केले आहे.
